Maharashtra New Expressway : गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. या रस्त्याच्या मोठमोठ्या प्रकल्पांमुळे राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळाली आहे. मुंबईमध्ये देखील रस्ते विकासाची अनेक कामे पूर्ण झाली आहेत. मुंबईला काही मोठमोठ्या महामार्गांची भेट मिळाली आहे.
मुंबई ते बडोदा दरम्यानही नवीन महामार्ग विकसित केला जात असून या महामार्ग प्रकल्पाच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडोदा-मुंबई महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील माथेरानच्या डोंगराखालील पहिल्या बोगद्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे, म्हणून नव्या वर्षात हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर पनवेल ते बदलापूर दरम्यान चा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.
येत्या 25 जुलै 2025 पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता असून त्यामुळं नव्या वर्षात बदलापूर ते पनवेल दरम्यानचा प्रवास फक्त आणि फक्त 20 मिनिटांत होणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे वाहनाचालकांचा वेळ वाचणार अन वाहतूक कोंडीतून बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे.
हा महामार्ग मुंबई दिल्ली महामार्गाचाचं भाग आहे. हा मार्ग नवी मुंबई विमानतळ तसेच जीएनपीएला जोडला जाणार आहे. या प्रकल्प अंतर्गत माथेरानच्या डोंगरातील शिरवली गावाजवळ सुमारे सव्वाचार किमीच्या अंतरावर दुहेरी बोगद्याचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे.
शेवटच्या पॅकेज क्रमांक 17 चे सुद्धा 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्याच्या चार मार्गिका असणार आहेत. या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंजसुद्धा देण्यात आले आहेत.
या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या 15 महिन्यातच बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. म्हणून या संपूर्ण महामार्गाचे काम सुद्धा वेळेच्या आधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या या महामार्गाचे काम पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे.
बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. पॅकेज क्रमांक 17 हा 9.6 किमी अंतराचा असून बदलापूरच्या भोज गावापासून ते पनवेलमधील मोरबे गावापर्यंत हा रस्ता बांधला जाणार आहे. सध्या पनवेलमार्गे बदलापूरला जाण्यासाठी ठाणे-डोंबिवली असा लोकलने प्रवास करावा लागतो.
मात्र आता या महामार्गामुळं प्रवास अवघ्या 10 मिनिटांत होणार आहे. दुसरीकडे मुंबई ते बदलापूर हा प्रवास देखील अवघ्या अर्धा तासात करता येईल असा दावा केला जात आहे. या महामार्गाचे काम येत्या नऊ महिन्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर हा महामार्ग प्रत्यक्षात सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.