Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात सध्या विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. पुणे शहरातही विविध रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. यात पुणे रिंग रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा देखील समावेश होतो. दरम्यान आता पुणे रिंग रोड प्रमाणेचं नाशिकमध्ये ही रिंग रोड तयार होणार आहे.
खरंतर क्षेत्र नाशिक येथे दर दहा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत असते. पुढील वर्षी देखील कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात रिंग रोड तयार होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि प्रमुख मार्गांना जोडण्यासाठी बाह्यवळण रस्ता तयार होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 137 किलोमीटर लांबीचा हा बाह्य वळण रस्ता विकसित केला जाणार आहे.
यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बाह्य वळण रस्त्यामुळे राज्य मार्गांवरील आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक शहरात न जाता बाह्य वळण रस्त्याने शहराबाहेरून वळवली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून जाणारा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग, नाशिक-छत्रपती संभाजीनगर, गुजरातकडे जाणारा पेठ रस्ता, दिंडोरी रस्ता अशा प्रमुख रस्त्यांना हा बाह्य वळण रस्ता विशिष्ट ठिकाणी जोडला जाणार आहे.
यामुळे शहरात घुसणारी वाहतूक शहराबाहेरून वळवता येणे शक्य होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणातील असा विश्वास व्यक्त होत आहे. कुंभमेळ्यासाठी संपूर्ण जगभरातील सनातनी भाविक श्रीक्षेत्र नाशिक येथे हजेरी लावत असतात.
दरम्यान या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी बाह्यवळण रस्त्याचे काम केले जाणार आहे. या बाह्य वळण रस्त्यामुळे अर्थातच रिंग रोड मुळे नाशिक शहरातील प्रदूषण कमी होईल आणि वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.
हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते सय्यद पिंप्री, लाखलगाव, चिंचोली, पांढुर्ली, चाकूर, दुगाव, गिरणारे, आंबे दिंडोरी, मानोरी ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन आणि राज्य मार्ग क्रमांक ३७ असा राहणार आहे. हा प्रस्तावित वळण रस्ता काही ठिकाणी डांबरी तर, काही ठिकाणी सिमेंटचा बनवला जाणार आहे.
या प्रकल्पांतर्गत काही मार्गांचे विस्तारीकरण आणि काही मार्गांचे संलग्नीकरण केले जाणार आहे. निश्चितच बाह्य वळण रस्ता तयार झाला तर शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी फुटणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.