Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. समृद्धी महामार्गासारखे मोठ-मोठे महामार्ग देखील विकसित झाले आहेत. मुंबईतही अनेक प्रकल्प पूर्ण झाली आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या देखील बळावत चालली आहे. हेच कारण आहे की शहरातील हे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. या सोबतच अनेक रस्त्यांचे प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत.
यातील काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरु आहेत. दरम्यान, आता मुंबई शहरात देशातील सर्वाधिक लांबीचा भुयारी मार्ग विकसित केला जाणार आहे. हा मार्ग ठाणे ते बोरीवली दरम्यान विकसित केला जाणार असून यामुळे 60 मिनिटांचा प्रवास फक्त आणि फक्त बारा मिनिटात पूर्ण होणार आहे.
यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे. मुंबईच्या नॅशनल पार्कच्या जंगलातून हा भुयारी मार्ग विकसित होणार आहे. हा भुयारी मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए च्या माध्यमातून उभारला जाणार आहे. यासाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कडून कर्ज काढले जाणार आहे.
ठाणे ते बोरिवली दरम्यानचा या दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे प्रवासाच्या कालावधीत एका तासाची बचत होणार आहे. हा जवळपास 16 हजार 600 कोटी रुपयांचा प्रकल्प राहणार आहे. ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्प घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत एकूण 11.8 किमी लांबीचा भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. या प्रकल्पात 10.25 किमीचा दुहेरी बोगदा विकसित होणार आहे. या दोन्ही बोगद्यांमध्ये दोन मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका बांधली जाणार आहे. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास विनाथांबा आणि सिग्नलरहित होणार अशी माहिती प्राधिकरणाकडून दिली जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्पाची पायाभरणी नुकतीच झाली आहे. स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली असून येत्या काही दिवसात प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण होईल अशी आशा आहे. अर्थातच हा संपूर्ण भुयारी मार्ग 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे.