Maharashtra New Expressway : राज्यात गेल्या काही वर्षांपासून दळणवळण व्यवस्था सुधारण्यावर शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील रस्ते वाहतूक सुधारण्याकडे शासनाचे आणि प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. राजधानी मुंबईमध्ये देखील रस्ते वाहतूक अधिक मजबूत केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेशात एका नवीन प्रवेश नियंत्रित महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात विरार ते अलिबाग दरम्यान बहुउद्देशीय मार्गीका विकसित केली जात आहे. या अंतर्गत 128 किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित होणार असून याच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. तथापि या मार्गासाठीचे भूसंपादन खूपच कासवगतीने सुरू आहे.आतापर्यंत या प्रकल्पासाठी फक्त पाच टक्के भूसंपादन होऊ शकले आहे.
भूसंपादन करताना प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या भागात जमिनीचे दर आकाशाला भिडले आहेत आणि अशा परिस्थितीत येथील भूसंपादन हे खूपच आव्हानात्मक बनले आहे. मात्र लवकरच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण होईल आणि या प्रकल्पासाठी कंत्राटदार नियुक्त केला जाईल असे म्हटले जात आहे.
कसा आहे मार्ग
विरार ते अलिबाग दरम्यान 128 किलोमीटर लांबीचा बहुउद्देशीय मार्ग विकसित होणार आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात वसई येथील नवघर ते तालुक्यातील बलावली या दरम्यानच्या 96 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम केले जाणार आहे.
या पहिल्या टप्प्याचे काम एकूण 11 पॅकेज मध्ये केले जाणार आहे. यासाठी एमएसआरडीसीने 19 हजार 334 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. विशेष म्हणजे या निविदा 18 एप्रिलला खुल्या केल्या जाणार आहेत.
या प्रकल्पासाठी तब्बल 60,000 कोटी रुपयांचा खर्च होणार असून यापैकी 22 हजार कोटी रुपये हे भूसंपादनासाठी लागणार आहेत. मात्र या प्रकल्पासाठी भू संपादन करतांना प्रशासनापुढे वेगवेगळ्या अडचणी उभ्या राहत आहेत.
या भागात जमिनीचे दर हे खूपच अधिक असल्याने येथील जमीन मालकाकडून हरखती दाखल केल्या जात आहेत एवढेच नाही तर काही जमीन मालक काही भागातील जमिनी देण्यास नकार दर्शवत आहे.
हेच कारण आहे की, आत्तापर्यंत या प्रकल्पासाठी फक्त पाच टक्के एवढे भूसंपादन झाले आहे. मात्र मे 2024 अखेरपर्यंत या प्रकल्पासाठीचे संपूर्ण भूसंपादन पूर्ण होईल अशी आशा आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पाला गती मिळणार आहे.