Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे (Rain) उघडीत बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही पाऊस (Monsoon) सुरूच आहे. राजधानी मुंबई तसेच ठाणे परिसरात काल पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे.
एवढेच नाही तर पश्चिम महाराष्ट्र विशेषता घाटमाथ्यावर पावसाची हजेरी बघायला मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातही पाऊस (Monsoon News) पडला आहे. मात्र राज्यातील इतर भागात पावसाने उघडीप दिली असल्याने खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांना याचा मोठा फटका बसत आहे. खरीप हंगामातील पिके पावसाच्या कमतरतेमुळे करपत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. आजपासून पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता (Rain Alert) हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील जारी केला आहे.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता (Maharashtra Rain Alert) आहे. या अनुषंगाने हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मित्रांनो कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे.
यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता मराठवाड्यातील या जिल्ह्यांना देखील भारतीय हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे राज्यातील विशेषतः विदर्भातील खरीप हंगामातील सर्व पिके पाण्याखाली गेली होती.
या अतिमुसळधार पावसापासून वाचलेल्या पिकांना शेतकरी बांधवांनी अतिशय शर्थीने जोपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने चांगलीच दडी मारली असल्याने खरीप हंगामातील पिके उन्हामुळे करपत असल्याचे शेतकरी बांधव नमूद करत आहेत. विशेषता मराठवाड्यातील पिके पावसाअभावी जळून खाक होत असल्याचे दृश्य आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला हा सुधारित अंदाज शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासा देणारा सिद्ध होणार आहे.