Maharashtra Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अध्यावत माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. राज्यात मान्सून (Monsoon News) सक्रिय झाला असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पावसाच्या (Rain) धारा बघायला मिळत आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांच्या (Farmer) चेहऱ्यावर मोठे समाधान असून राज्यात पेरणीच्या कामाला आता मोठा वेग आला आहे. राजधानी मुंबईत (Mumbai) तसेच कोकणात पुण्यात (Pune) मोसमी पावसाची हजेरी बघायला मिळत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुट्टीवर असलेला मान्सूनचा पाऊस पुन्हा एकदा सुरू झाल्याने राज्यात शेती कामाला गती मिळाली आहे. शिवाय अमावस्येच्या काळोखाप्रमाणे भासणार्या शेतीशी संबंधित उद्योगधंद्यात देखील आता मोठी प्रसन्नता बघायला मिळत आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. एवढेच नाही आज कोकणातील विशेषता रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सऱ्या बसणार असल्याची भविष्यवानी देखील हवामान विभागाने केली आहे. कोकणात विशेषता किनारी भागात आज जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
आज कोकणातील सिंधुदुर्ग आणि ठाणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रायगड मध्ये देखील मोसमी पाऊस बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. राजधानी मुंबई तसेच ठाण्यात आज ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. शिवाय आज मुंबई आणि ठाण्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा जवळपास राज्यात सर्वत्र पावसाचा येलो ॲलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह मोसमी पाऊस बरसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांना देखील काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
कोकणातील ठाणे पालघर मुंबई रायगड या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या विभागाला देखील भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. खरं पाहता मराठवाड्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे येत्या काही दिवसात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.