Maharashtra Ladki Bahin Yojana : शिंदे सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्यापासून लाभ दिला जात आहे. 14 ऑगस्टच्या सायंकाळपासून लाडकी बहिणी योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावर जमा केले जात असून आत्तापर्यंत जवळपास 90 लाखाहून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला आहे.
या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले होते आणि ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी 1500 असे एकूण तीन हजार रुपये जमा केले जात आहेत. मात्र अनेक पात्र महिलांचे बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
बँक अकाउंट आधार सोबत लिंक नसल्याने या योजनेसाठी पात्र ठरूनही जवळपास 27 लाख महिलांना याचे पैसे मिळणार नाहीयेत. यामुळे ज्या महिलांना अजून या योजनेचे पैसे मिळालेले नसतील त्यांनी त्यांचे बँक अकाउंट आधार सोबत लिंक आहे की नाही हे चेक करायचे आहे.
हे काम महिलांना घरबसल्या करता येणार आहे. तसेच बँक अकाउंटला घरबसल्या आधार कार्ड लिंक करता येणार आहे. दरम्यान आज आपण बँक अकाउंटला आधार कार्ड घरबसल्या लिंक कसे करायचे याच संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँक अकाउंट आधारला लिंक आहे की नाही कसे चेक करणार?
तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://uidai.gov.in या वेबसाईटवर भेट द्यायची आहे. यानंतर तुम्हाला माय आधार या पर्यायावर जायचे आहे.
मग तुम्हाला लॉगिन घ्यावे लागणार आहे यासाठी तुम्हाला आधार कार्ड क्रमांक आणि कॅपच्या कोड टाकायचा आहे. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी दिलेला रकान्यात भरायचा आहे. यानंतर तुम्हाला Bank seeding status या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बँकेचे नाव, तुमचे खाते ऍक्टिव्ह आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. जर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव दिसले तर समजून जा की तुमचे बँक आधारसोबत लिंक आहे.
बँक अकाउंट आधार सोबत लिंक नसल्यास काय करावे?
बँक अकाउंट आधार सोबत लिंक नसल्यास तुम्ही NPCI या संकेतस्थळावर भेट देऊन बँक अकाउंट आधार सोबत लिंक करू शकता. यासाठी एनपीसीआयच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर consumer या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
नंतर भारत आधार सीडींग या ऑप्शन वर जायचे आहे. मग तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे अन Request For Aadhar Seeding या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आता तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे, त्या बँकेचे नाव निवडायचे आहे आणि खाली fresh seeding वर क्लिक करावे लागणार आहे. मग तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. टर्म्स अँड कंडिशन्स स्वीकारायचे आहे. मग कॅपचा कोड भरून हा अर्ज सबमिट करायचा आहे. अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या बँक खात्यासोबत तुमचे आधार कार्ड लिंक करू शकता.