Maharashtra Jamin Kayda : अलीकडे वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी कारणांमुळे शेतीची जमीन कमी होत चालली आहे. याशिवाय कुटुंबात होत असलेले विभाजन पाहता अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
अशा परिस्थितीत अनेकजण आता नवीन शेती घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान नवीन शेतजमीन विकत घेणाऱ्यांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे.
कारण की आज आपण महाराष्ट्रात एका व्यक्तीला जास्तीत जास्त किती शेत जमीन विकत घेता येते ? याबाबत महाराष्ट्रात कोणता कायदा अस्तित्वात आहे, याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
त्यामुळे जर तुम्हीही शेती करण्यासाठी नवीन शेत जमीन घेण्याच्या तयारीत असाल किंवा गुंतवणूक म्हणून शेतजमीन विकत घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे.
सर्वप्रथम महाराष्ट्रात फक्त शेतकऱ्याला शेत जमीन विकत घेता येते, ही गोष्ट लक्षात असू द्या. म्हणजेच ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे अशाच शेतकऱ्याला महाराष्ट्रात जमीन विकत घेता येते. जे शेतकरी नाहीत त्यांना राज्यात जमीन विकत घेता येत नाही.
दरम्यान एका शेतकऱ्याला महाराष्ट्रात किती जमीन विकत घेता येते तर एका शेतकऱ्याला महाराष्ट्रात कमाल 54 एकर एवढी जमान विकत घेता येते. पण जमिनीच्या प्रकारानुसार कमाल जमीन धारणा भिन्न आहे.
कायदा काय सांगतो ?
महाराष्ट्रातील सिलिंग कायद्यानुसार, जर बागायती जमीन असेल तर एका व्यक्तीला कमाल 18 एकर जमीन विकत घेता येते. बारा महिने पाणीपुरवठा नसणारी परंतु वर्षातून एक पीक घेता येते अशी जमीन असेल तर एका व्यक्तीला कमाल 27 एकर जमीन विकत घेता येते.
हंगामी बागायती जमीन असेल तर एका व्यक्तीला कमाल 36 एकर एवढी जमीन विकत घेता येते. तसेच जर पूर्णपणे कोरडवाहू जमीन असेल तर एका व्यक्तीला अशा प्रकारातील कमाल 54 एकर एवढी जमीन विकत घेता येते.
अर्थातच महाराष्ट्रात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त 54 एकर एवढी जमीन राहू शकते. हा महाराष्ट्रातील कमाल जमिन धारणा कायदा आहे.
याला प्रामुख्याने सीलिंग कायदा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख प्राप्त आहे. काही लोक यालाच कमाल जमीन धारणा कायदा म्हणून ओळखतात.