Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे.
खरे तर, पंजाबरावांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे.
यामुळे शेतकरी बांधव पंजाबरावांचा हवामान अंदाजाकडे विशेष लक्ष ठेवून असतात. विशेष बाब अशी की, पंजाबराव देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानात बदल झाल्यास लगेचचं यूट्यूब, व्हाट्सअप यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सुधारित हवामान अंदाज जारी करत असतात.
याच अनुषंगाने आज अर्थातच 25 जानेवारी 2024 ला पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. दरम्यान आज आपण पंजाबरावांनी या नवीन हवामान अंदाजात काय माहिती दिली आहे, याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हणताय पंजाबराव
उत्तर महाराष्ट्र : पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे आज 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
तसेच आज रात्रीपासून या विभागात थंडीचा जोर वाढेल असे त्यांनी नमूद केले आहे. या कालावधीत उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होणार नाही असे देखील त्यांनी सांगितले आहे.
पश्चिम महाराष्ट्र : 4 फेब्रुवारी पर्यंत यादेखील विभागात उत्तर महाराष्ट्राप्रमाणेच हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. येथे देखील थंडीचा जोर हळूहळू वाढणार आहे.
मराठवाडा : मराठवाडा विभागात अर्थातच औरंगाबाद विभागात असलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये आता चार फेब्रुवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि थंडीचा जोर वाढेल असा नवीन हवामान अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे.
विदर्भ : विदर्भ विभागातील अमरावती विभागात आणि नागपूर विभागात 4 फेब्रुवारीपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
खरे तर विदर्भात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस पाहायला मिळाला होता. मात्र आता येथील हवामान कोरडे होणार आहे आणि अवकाळी पाऊस बरसणार नाही असे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे.