Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात सध्या ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. काही भागात सूर्यदेव जणू आग ओकत आहे. प्रचंड तापमान वाढ झाली असल्याने मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाचा ताप वाढला असल्याने नागरिक घामाघूम होत आहेत.
दुसरीकडे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे. एकंदरीत राज्यात विषम हवामानाची अनुभूती येत आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने आणखी एक नवीन अंदाज जारी केला आहे.
या नवीन अंदाजात आय एम डी ने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता कायम ठेवली आहे तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असे सांगितले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे.
याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान होत आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस सुरू आहे. आज देखील राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वादळी पावसाची शक्यता लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाचे आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान आता आपण भारतीय हवामान खात्याने कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठे बरसणार वादळी पाऊस
हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या तीन विभागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. या संबंधित विभागातील 11 जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज आयएमडीने दिला आहे.
अहिल्यानगर पुणे यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. आज अहिल्यानगर, पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर या सदर अकरा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यातील कोकण विभागातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे.
आज राजधानी मुंबईसह उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार अशी शक्यता आहे.
यामुळे या सदर जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःचा बचाव करायचा आहे. आवश्यक असेल तेव्हाच दुपारच्या वेळी बाहेर पडले पाहिजे असे आवाहन यावेळी तज्ञांनी केले आहे.