Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम म्हणून सर्वत्र उकाड्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. ऑक्टोबर हिटमुळे नागरिक खूपच परेशान आहेत. अशातच मात्र उकाड्याने परेशान झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे पुढील आठवड्यात देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार होत असल्याने याचा परिणाम म्हणून 15 आणि 16 ऑक्टोबरला महाराष्ट्रासह देशातील काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होत असल्याने अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर, सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये 32 ते 33 अंश सेल्सिअस पर्यंतचे सरासरी तापमान पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी याहीपेक्षा अधिकचे तापमान नमूद केले जात आहे.
यामुळे मात्र नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पण आता अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार होत असल्याने 15 आणि 16 ऑक्टोबरला मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीय परिस्थितीमुळे पाऊस पडणार आहे. १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी मुंबई पुणे सह राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे आता हवामान विभागातील तज्ञांनी वर्तवलेला हा हवामान अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.