Maharashtra Havaman Andaj : नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बंगालच्या उपसागरात फेंगल नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झाली, याचा प्रभाव हा देशातील तामिळनाडू पुदुच्चेरी आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये पाहायला मिळाला.
महाराष्ट्रात देखील या चक्रीवादळामुळे पावसाने दणका दिला होता. याच अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची तीव्रता कमी झाली आणि शेती पिकांचे नुकसान झाले. दरम्यान आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे.
यामुळेच राज्यात पुन्हा एकदा ढगाळ हवामानाची शक्यता असून थंडीची तीव्रता कमी होणार आहे. येत्या दोन दिवसांनी अर्थातच रविवारपासून राज्यात ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते आणि यामुळे थंडीची तीव्रता कमी होईल.
रविवारपासून ढगाळ हवामानासोबतच राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार आहे. बंगालच्या उपसागरात मागे ज्याप्रमाणे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि त्यानंतर तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस झाला तशीच परिस्थिती आताही पाहायला मिळेल आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, तामिळनाडू मध्ये होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात दाखल होणार आहेत. म्हणून रविवारपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण जास्त काळ राहील असे म्हटले जात आहे. प्रामुख्याने राज्यातील सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण जास्त काळ राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे रविवारपासून पुढील पाच दिवस राज्यातील कमाल – किमान तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या तरी बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची शक्यता देण्यात आलेली नाही.
मात्र राज्यात ढगाळ वामन राहणार असल्याने याचा फटका शेती पिकांना बसू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी केले आहे.