Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातून आता ऑक्टोबर हिटचा प्रभाव कमी झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट आली असल्याने ऑक्टोबर हिटपासून नागरिकांना दिलासा मिळत आहे. सोबतच आता राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.
सकाळच्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहे. जळगाव हे महाबळेश्वर पेक्षा थंड बनले आहे. काल जळगाव येथे सकाळचे किमान तापमान 11.3 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे.
जळगाव मध्ये सकाळी सकाळी बोचरी थंडीचा अनुभव येत आहे. याशिवाय राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट आली आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार आहे. तत्पूर्वी मात्र हवामानात एक मोठा चेंज आला आहे. यामुळे राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
हवामान खात्याने याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रात एकीकडे थंडीची चाहूल लागली आहे तर ऐन हिवाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तास महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वाचे राहणार आहे.
कारण की येत्या 48 तासात राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातील काही भागांमध्ये पाऊस बरसणार असा अंदाज आहे. IMD ने सांगितलं की, येत्या 48 तासात राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच कोकणात देखील पाऊस पडणार आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्र व्यतिरिक्त दक्षिण भारतात देखील सध्या पावसाचे वातावरण आहे. केरळ, तामिळनाडू यांसारख्या राज्यात सध्या पाऊस सुरू असून आगामी काही दिवस या परिसरात पावसाचा अंदाज आहे.