Maharashtra Havaman Andaj : गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. आभाळाकडे नजरा लावून बसलेल्या बळीराजासाठी वरूणराजाने सांगावा पाठवला आहे.
आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिमीं वाऱ्याची तीव्रता कमी आहे मात्र दक्षिण गुजरात मधील वाऱ्यांमुळे चक्रीय स्थिती निर्माण होत आहे.
याच्या प्रभावामुळे उत्तर कोकण-महाराष्ट्रात पावसाची शक्यता तयार होत आहे. एवढेच नाही तर येत्या काही तासात पश्चिमीं वाऱ्यांची तीव्रता देखील वाढणार आहे. यामुळे आगामी काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर केव्हा वाढणार ?
राज्यात सध्या पावसाच्या हलक्या सऱ्या बरसत आहेत. परंतु शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज आहे. जोरदार पाऊस झाला तर पुन्हा एकदा खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे आणि विहिरीमधील तसेच धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने 25 ऑगस्ट पासून म्हणजेच उद्यापासून पश्चिमी वाऱ्यांची तीव्रता वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच या हवामान प्रणालीमुळे येत्या तीन ते चार दिवसात पावसाच्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे देखील हवामान विभागाने नमूद केले आहे.
या भागात पडणार पाऊस?
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्यात बहुतांशी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होणार असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त तहानलेल्या मराठवाड्यासाठी देखील गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडणार अशी शक्यता आहे.
तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी मेजगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार असे बोलले जात आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या परिसरात आज पासून ते 29 ऑगस्ट पर्यंत ढगाळ हवामानाची आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
निश्चितच भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला हा हवामान अंदाज जर खरा ठरला तर राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पावसाअभावी करपत असलेल्या पिकांना यामुळे नवसंजीवनी मिळणार आहे.