Maharashtra Havaman Andaj October : गेल्या महिन्यात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाचा पर्व मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. विशेष बाब म्हणजे गेल्या महिन्यात गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे संकट होते.
उत्सव सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात कुठेच म्हणावा असा पाऊस झालेला नव्हता. ऑगस्टमध्ये पावसाचा 21 दिवसांपेक्षा अधिकचा खंड होता आणि गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही राज्यातील काही भाग वगळता उर्वरित भागात हवामान कोरडेच होते.
यामुळे महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडणार असेच वाटत होते. या दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील मात्र गणेशोत्सवाचा सण सुरू झाला, मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात आले. विशेष असे की,
गणेशोत्सवाला सुरुवात झाली, लाडक्या बाप्पाचे गणेश भक्तांच्या घरी आगमन झाले आणि तोच जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे गणेश भक्तांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण तयार झाले. बळीराजाला मोठा दिलासा मिळाला.
19 सप्टेंबरला सुरू झालेला हा गणेशोत्सव 28 सप्टेंबर पर्यंत अर्थातच अनंत चतुर्थी पर्यंत सुरू राहिला आणि या दहा दिवसांच्या काळात राज्यभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्राला किंचित दिलासा मिळाला.
शेतकऱ्यांच्या पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्या. खरंतर गणेशोत्सवाच्या सणाला दरवर्षी पाऊस हजेरी लावतोच. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थितीचा अनुभव महाराष्ट्राला येत होता. यामुळे यंदा गणेशोत्सवाच्या सणाला पाऊस पडणार की नाही याबाबत संभ्रमावस्था होती.
परंतु याही वर्षी गणेशोत्सवाला चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान आता नवरात्र उत्सवाच्या काळात महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल का, विजयादशमीला राज्यात चांगला पाऊस पडेल का हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
दरम्यान पंजाबराव डख यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्रात 3 ऑक्टोबर पासून पाऊस उघडीप घेणार आहे. आता राज्यात जवळपास 25 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार नाही.
डख यांनी सांगितले की 25 ऑक्टोबर पर्यंत राज्यात कुठेच मुसळधार पाऊस पडणार नाही. मात्र त्यानंतर राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. यामुळे 25 ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. एकंदरीत यावर्षी 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव साजरा होणार आहे आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे.
या कालावधीत यावर्षी पाऊस पडणार नाही असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. पण विजयादशमीचा अर्थातच दसऱ्याचा सण साजरा झाल्यानंतर, लगेचच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो असे मत पंजाबरावांनी व्यक्त केले आहे. तसेच पंजाबरावांनी नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या दिवाळी सणाला देखील यावर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज बांधला आहे.