Maharashtra Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्रात पर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
हेच कारण आहे की महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. याच हवामान प्रणालीमुळे राज्यातील उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसासह गारपीट होईल असा अंदाज देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आगामी पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे आज राज्यातील जवळपास 31 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्हे वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संपूर्ण कोकण, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आज पाऊस पडणार असा अंदाज आहे. मात्र मराठवाड्यातील तीन जिल्हे आणि विदर्भातील दोन जिल्ह्यात पावसाची शक्यता नाहीये.
आज कुठे पडणार पाऊस
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज खानदेश मधील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नासिक तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
म्हणून यासंबंधीत जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. यासोबतच आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज आहे. त्यामुळे आज संपूर्ण कोकण अन पश्चिम महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय आज मराठवाड्यातील लातूर, नांदेड हे जिल्हे वगळता संपूर्ण मराठवाड्यासाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भ विभागातील भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे वगळतात संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
28 नोव्हेंबर पर्यंत जोरदार पाऊस होणार !
उद्या उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नासिक मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि संपूर्ण विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता असून या संबंधित भागासाठी उद्याही येलो अलर्ट जारी झाला आहे.
28 नोव्हेंबरचा विचार केला असता या दिवशी राज्यातील मराठवाडा विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि संपूर्ण विदर्भात पाऊस पडणार असा अंदाज असून या भागासाठी 28 नोव्हेंबरला देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे.