Maharashtra Havaman Andaj : नुकत्याच काही दिवसांपूर्वी नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मानसून भारतातून परतला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे. तापमान वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक पूर्णपणे बेजार झाले आहेत.
अशातच आता मध्य बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार झाले आहे. मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. विशेष म्हणजे हे चक्रीवादळ येत्या 24 तासात आणखी तीव्र रूप धारण करणार आहे. याचा परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काही भागात ताशी 150 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. एकंदरीत या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून देशातील काही भागांमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान हवामान खात्याने या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर आणि गुजरात वर काय परिणाम होईल? याबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. आता आपण हवामान विभागाने या चक्रीवादळाचा कोणत्या राज्यांवर परिणाम होणार, कुठे मुसळधार पाऊस पडणार याबाबत दिलेली सविस्तर अशी अपडेट जाणून घेणार आहोत.
काय म्हणतंय हवामान विभाग ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 22 ऑक्टोबर रोजी दुपारनंतर तेज चक्रीवादळ अधिक तीव्र बनणार आहे. या वादळाचा परिणाम म्हणून दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रावर 150 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे केरळ आणि तामिळनाडू मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळाचा या दोन्ही राज्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून या दोन्ही राज्यातील विविध भागांमध्ये यामुळे मुसळधार वादळी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच या वादळामुळे जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब, पश्चिम राजस्थान आणि पुद्दुचेरीमध्येही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या संबंधित राज्यांमधील नागरिकांना चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता अधिक सचक आणि सतर्क राहण्याचा सल्ला यावेळी तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना देखील समुद्रात जाऊ नये असे आवाहन यावेळी जाणकार लोकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. चक्रीवादळामुळे कोणतीच विपरीत घटना घडू नये यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातवर काय परिणाम होणार
हे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होत असल्याने याचा महाराष्ट्र आणि गुजरात वर देखील परिणाम होणार का हा प्रश्न येथील नागरिकांच्या माध्यमातून आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान याबाबत भारतीय हवामान खात्याने देखील माहिती दिली आहे. हवामान खात्याने तेज चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर कोणताच परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
याशिवाय महाराष्ट्राच्या शेजारील राज्य गुजरात मध्ये देखील याचा कोणताच परिणाम होणार नाही असे हवामान खात्याने यावेळी सांगितले आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर कोणताच थेट परिणाम पाहायला मिळणार नाही. गुजरात मध्ये आगामी सात दिवस प्रामुख्याने हवामान कोरडे राहील असे देखील IMD ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.