Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष खास होणार आहे. कारण की, भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरंतर, यावर्षी संपूर्ण मान्सून काळात महाराष्ट्रात म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही.
जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, यानंतर जुलै महिन्यात राज्यात मोठा पाऊस झाला. परंतु पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड पाडला आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी एवढा पाऊस पडला आहे. जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला असल्याने राज्यात या वर्षी सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
यामुळे खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या खरीपातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. आता येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, रब्बी हंगामाच्या ऐन तोंडावरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
IMD ने महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनने देशाच्या निरोप घेतला आहे. आता दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) दाखल झाला आहे.
यामुळे बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा परिणाम म्हणून देशाच्या पूर्व किनारपट्टीवर ढगांची गर्दी पाहायला मिळतं आहे. दरम्यान, या हवामानात झालेल्या बदलामुळे आपल्या राज्यातही पावसासाठी पूरक परिस्थिती तयार होत आहे.
गेल्या काही तासात राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी सुद्धा लावली आहे. विशेष म्हणजे आज देखील राज्यातील कोकण विभागात पावसाची शक्यता आहे.
उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात आज विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ व कोरड्या हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.