Maharashtra Hailstorm Alert : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानातं सातत्याने बदल होत आहे. मात्र, हवामानात होत असलेल्या बदलांचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात पुरेसा पाऊस झाला नाही. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.
पण मान्सूनोत्तर वादळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आणि या चालू वर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे.
विशेष म्हणजे या चालू एप्रिल महिन्यातही पुन्हा अवकाळीचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून वादळी पावसाचे सावट पाहायला मिळत आहे. वादळी पावसाने तथा गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
काढणीसाठी तयार असलेले शेतीपीक अन काढणी झालेल्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. अशातच हवामान खात्याने आज देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज दिला आहे.
तसेच काही ठिकाणी गारपीट होईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. खरंतर राज्यातील अनेक भागात तापमान विक्रमी पातळीवर पोहोचले असून उन्हाचा चटका असह्य होत आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून सक्रिय झाला आहे.
याचा परिणाम म्हणून आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
काल राज्यातील काही भागांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअस पार गेले. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात तापमान 42 अंशाच्या पार नोंदवले गेले आहे.
रंतु आज राज्यातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच आज सोलापूर, धाराशिव, बीड लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस हजेरी लावू शकतो असे आय एम डी ने आपल्या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.