Maharashtra Gharkul Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्यांसाठी आणि गरजू नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. ज्या लोकांना हक्काचे घर नाहीये त्यांच्यासाठी देखील राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना, ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी मोदी आवास योजना याशिवाय पंतप्रधान आवास योजना अशा अनेक योजना राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत.
दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर शहरातील नागरिकांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम जवळपास ठप्प झाले आहे.
मात्र असे असले तरी गोरगरीब जनतेसाठी रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. योजनेअंतर्गत 4866 घरकुलांची कामे सुरू आहेत. त्यातील 3253 घरांची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना 106.31 कोटी रुपयांचा निधी वाटण्यात आला आहे.
वास्तविक या योजनेतून शहरात 5000 घरे बांधण्याचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. तसेच यासाठी शासनाच्या माध्यमातून 111.32 कोटी रुपयांची तरतूद देखील करून देण्यात आली आहे.
त्यामुळे छत्रपती संभाजी नगर शहरातील गरजू लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत शहरी भागातील नागरिकांना घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी योजना राबवली जात असून या अंतर्गत 30 चौरस मीटर घर बांधकाम करण्यासाठी अडीच लाखांचे अनुदान मिळते. पण अनुदानाची ही रक्कम टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असते.
अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण तीन टप्प्यात जमा केली जाते. छत्रपती संभाजी नगर शहरातील गरजू नागरिकांसाठी महापालिकेला 5,000 घरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
त्यासाठी 111.32 कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आली असून यापैकी 106.31 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहे. म्हणजे मंजूर करण्यात आलेल्या निधी पैकी पाच कोटी एक लाख रुपये एवढा निधी शिल्लक आहे.
दरम्यान आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 35 कोटी 31 लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे आता हा निधी शासनाच्या माध्यमातून केव्हा उपलब्ध करून दिला जाईल आणि बाकी राहिलेल्या नागरिकांना केव्हा घरकुलाचा लाभ मिळेल हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.