Maharashtra Gas Cylinder News : गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे अक्षरशः बेजार झाले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेल, CNG तसेच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून सरकार विरोधात सर्वसामान्यांमध्ये मोठी नाराजगी पाहायला मिळत आहे.
याचं नाराजीचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बसला असून विधानसभा निवडणुकीतही असा फटका बसू नये यासाठी महायुती सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकार सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न करणार आहे.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात एक नवीन योजना सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरवर्षी गॅस सिलेंडर मोफत भरून मिळणार आहे.
निश्चितच असे झाल्यास सर्वसामान्य महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून यामुळे त्यांचे स्वयंपाक घरातील बजेट थोडे पूर्वपदावर येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी अर्थातच 28 जून 2024 ला 2024 25 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होणार आहे. याच अर्थसंकल्पात आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे.
या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत भरून मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.
या योजनेची घोषणा आज विधीमंडळात होणार असा दावा प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये सूत्रांचा हवाल्याने करण्यात आला आहे. यामुळे नक्कीच सर्वसामान्य गरीब महिलांना मोठा फायदा होणार आहे.
ही योजना सुरू करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याचे समजतं आहे. यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य गरीब कुटुंबांसाठी आणि शेतकरी कुटुंबांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.