Maharashtra Farmer Scheme : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीने सरकार स्थापित केले. मात्र यावेळी एनडीए आघाडीला महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेश मध्ये मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये अर्थातच 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या बळावर केंद्रात सत्ता स्थापित केली होती.
दोन्ही निवडणुकांमध्ये बीजेपीला पूर्ण बहुमत मिळाले होते. 2024 च्या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा पार करता आला नाही. बीजेपीला सर्वात जास्त फटका उत्तर प्रदेश आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रात बसला.
राज्यातील शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे भारतीय जनता पक्षाला अनेक जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान येत्या तीन महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा महायुतीला मोठा फटका बसला आहे.
यामुळे आता विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी वरचढ ठरू नये यासाठी महायुतीच्या सरकारकडून विशेष प्रयत्न केले जाणार असे म्हटले जात आहे. महायुतीकडून राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकार शेतकरी कर्जमाफीचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या कर्जमाफीची घोषणा विधानसभा निवडणुकीच्या आधीच होऊ शकते असाही दावा होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य सरकार पातळीवर कर्जमाफीच्या हालचाली सुरू झाल्या असल्याच्या बातम्या काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आल्या आहेत.
सहकार विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती संकलित करण्याचे पत्र निर्गमित झाले असल्याची माहिती या बातम्यांमधून समोर आली आहे.
मात्र सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचे खंडन केले आहे. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप याबाबत कोणतेच पत्र प्राप्त झाले नसल्याचे म्हटले आहे.
तथापि शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकार दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करू शकते अशी खात्रीलायक बातमी काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली असल्याने राज्यात पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोर धरू लागली आहे.
यामुळे आता शिंदे सरकार शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी खरंच कर्जमाफीचा निर्णय घेणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.