Maharashtra Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 61 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शिंदे सरकारने हा निधी मंजूर केला आहे. नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी अर्थातच 10 सप्टेंबर 2024 ला या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, २०२२ मध्ये पावसाळी हंगामात अधिकच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सततच्या पावसामुळे त्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
खरेतर, 2022 मध्ये झालेल्या या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले होते. राज्य सरकारने त्यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दर आणि निकषानुसार १ हजार ५०० कोटीच्या निधीला मंजूरी दिली होती.
त्यानंतर मंजूर निधीपेक्षा जादा निधीची गरज असेल तर अशा जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना ज्यादा निधीची मागणी करावी अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त निधीची मागणी केली होती.
या मागणीनुसार राज्य सरकारनं चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६१ कोटी रुपयांच्या निधीसाठी मंजूरी दिली आहे. 10 सप्टेंबर 2024 ला याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे.
मात्र, राज्य सरकारकडून दिली जाणारे ही मदत दोन हेक्टर च्या मर्यादित दिली जाणार आहे. यामुळे नक्कीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
खरे तर गेल्या वर्षी कमी पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळवता आले नाही. अन त्याआधीही म्हणजे 2022 मध्ये ही शेतकऱ्यांना शेतीमधून फारसे उत्पादन मिळाले नव्हते.
अशा या परिस्थितीत शेतकऱ्यांना या शासनाच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, आता आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती अनुदान ?
अहमदनगर जिल्ह्यासाठी २५ कोटी ७४ लाख रुपये, परभणी जिल्ह्यासाठी २१ कोटी २९ लाख रुपये, अमरावती जिल्ह्यासाठी १३ कोटी २० लाख रुपये आणि वाशिम जिल्ह्यासाठी ६९ लाख रुपये निधी वितरणाला मंजूरी देण्यात आली आहे.