Maharashtra Farmer Scheme : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक कल्याणकारी योजना सुरू करण्याचा सपाटा लावला होता. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना देखील याच काळात सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
खरे तर या योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली मात्र याची अंमलबजावणी एप्रिल 2024 पासून सुरू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी मोफत वीज दिली जाणार आहे.
अशा परिस्थितीत, अनेकांच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना नेमकी कशी आहे ? या योजनेचा लाभ राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो असे अनेक प्रश्न उपस्थित होते. दरम्यान आज आपण याच संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतपंपासाठी मोफत वीज दिली जात आहे. याचा लाभ हा हा 7.5 अश्वशक्ति क्षमता असणाऱ्या कृषी पंप धारकांना मिळतो.
राज्यात जवळपास ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांकडे 7.5 अश्वशक्ती पर्यंतची क्षमता असणारे कृषी पंप आहेत. त्यामुळे या साऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतोय. या योजनेची अंमलबजावणी एप्रिल 2024 पासून सुरू झाली असून पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहणार आहे.
तथापि ही योजना सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी या योजनेचा एकदा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर मग त्यापुढील दोन वर्षे ही योजना चालू ठेवायची की नाही हे ठरवले जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत फक्त 7.5 अश्वशक्ति क्षमता असणाऱ्या कृषी पंप धारकांनाच लाभ मिळणार असे नाही तर याच्यापेक्षा कमी अश्वशक्तीच्या कृषी पंप धारकांना देखील याचा लाभ मिळणार आहे.
म्हणजेच पाच अश्वशक्तिचा कृषी पंप असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे 7.5 अश्वशक्ति पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही. या अशा शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज बिल भरावे लागणार आहे.