Maharashtra Farmer Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेकडो योजना राबवत आहे. तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील राज्य सरकार वेगवेगळ्या योजना चालवत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेची घोषणा केली आहे.
या अंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. विशेष बाब अशी की या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणारे हे फवारणी पंप 100% अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
खरे तर या योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले असून पात्र शेतकऱ्यांची निवडही करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेसाठी कापूस उत्पादन मूल्य साखळी अंतर्गत १ लाख ६ हजार तर सोयाबीन मूल्य साखळी अंतर्गत १ लाख ३० हजार शेतकऱ्यांच्या लक्षांक ठेवण्यात आला होता. यानुसार, या योजनेसाठी राज्यभरातील ४ लाख ९४ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते.
या सादर झालेल्या अर्जांमधून राज्यातील १ लाख ९१ हजार शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे. पण राज्यातील कोणत्या जिल्ह्यासाठी या योजनेचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार, यासाठी किती लक्षाॅंक ठेवण्यात आला आहे? याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यासाठी किती लक्षाॅंक आहे?
नाशिक – २३९०
धुळे – ५२०
नंदुरबार – ८१०
जळगाव – ९३०
अहिल्यानगर – २७४०
पुणे -६६०
सोलापूर – १४८०
सातारा – २३५०
सांगली – १३१०
कोल्हापूर – १३३०
छ.संभाजीनगर – ४५०
जालना – ४३४०
बीड – ७१००
लातूर – १३४००
धाराशिव – ८९००
नांदेड – ११०७८
परभणी – ७८३०
हिंगोली – ८०४०
बुलढाणा – १२३६०
अकोला – ६२७०
वाशिम – ९३४०
अमरावती – ८७५०
यवतमाळ – ८३५०
वर्धा – ३७१०
नागपूर – ३०००
चंद्रपूर – २६००