Maharashtra Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. खरे तर कापूस आणि सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारी दोन महत्त्वाची पिके.
या पिकांची राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र गेल्या वर्षी सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आणि बाजारात देखील कापूस आणि सोयाबीन अगदीच कवडीमोल दरात विकले गेले.
यामुळे शेतकऱ्यांना या दोन्ही पिकांच्या उत्पादनासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही. परिणामी राज्यातील अनेक शेतकरी बांधव कर्जबाजारी झालेत आणि त्याचमुळे गेल्या हंगामात कापूस आणि सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले गेले पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे सरकारने 2023 च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.
यासाठी आवश्यक निधीची देखील तरतूद करण्यात आली. मात्र, अजूनही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. दरम्यान, आता याच अनुदान योजने संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्थातच 30 सप्टेंबर 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे अनुदान जमा केले जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनच्या अनुदानाची वाट पाहिली जात होते ती प्रतीक्षा आता संपणार असे दिसत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे.
यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. खरे तर ऑक्टोबरच्या सुरुवातीला नवरात्र उत्सव त्यानंतर विजयादशमी अर्थातच दसरा आणि मग त्यानंतर दिवाळीचा सण साजरा केला आहे.
अशा परिस्थितीत या सणासुदीच्या काळात जर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली तर नक्कीच त्यांचा सण गोड होणार आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला जात आहे.