Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विविध रस्ते प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. देशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी, दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच शहरा-शहरांमधील अंतर कमी करून कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राजधानी मुंबईमध्ये देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पुल विकसित केला जात आहे. हा सागरी पूल मुंबई ते नवी मुंबई दरम्यान तयार केला जात असून सध्या या पुलाचे काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे. या पुलाला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणून ओळखले जात आहे.
या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अंतर्गत शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान सागरी ब्रिज विकसित होत आहे. या पुलाला श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान मुंबई ते नवी मुंबई मधील प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या या प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. हा पूल सर्वसामान्यांसाठी केव्हा सुरू होणार या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कसा असेल मार्ग
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अंतर्गत 21.8 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू तयार केला जात आहे. या सेतू पैकी 16 किलोमीटरचे अंतर हे समुद्रावर राहणार आहे तर उर्वरित अंतर हे जमिनीवर असेल. हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबईला जोडणार आहे.
हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर सेंट्रल मुंबईतील शिवरीहून नवी मुंबईतील शिवाजी नगरला अवघ्या 20 मिनिटांत जाता येणार आहे. सध्या स्थितीला हे अंतर पार करण्यासाठी दीड तासांचा कालावधी लागत आहे.
अर्थातच या पुलामुळे एका तासापेक्षा अधिकच्या वेळेत बचत होणार आहे. यामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास गतिमान होईल आणि शहरातील कनेक्टिव्हिटी आणखी सक्षम बनेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
केव्हा सुरु होणार हा प्रकल्प?
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अर्थातच श्री अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प 25 डिसेंबर 2023 रोजी सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. 25 डिसेंबरला या पुलाचे लोकार्पण होईल आणि त्यानंतर हा पूल लगेचच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
हा पूल सुरू झाल्यानंतर यावरून दिवसाला 70 हजारापर्यंत वाहने शंभर किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील अशी माहिती दिली जात आहे. यामुळे हजारो लोकांचा प्रवास गतिमान होणार आहे. तथापि या प्रकल्पाच्या लोकार्पणाबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मात्र काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये हा प्रकल्प 25 डिसेंबरला सुरू होणार असा दावा करण्यात आला आहे. यामुळे आता मीडिया रिपोर्ट्स मधला हा दावा प्रत्यक्षात खरा ठरेल का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.