Maharashtra Expressway News : पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा एक महत्त्वाचा एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 14 ऑक्टोबर पासून हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान हा महामार्ग बंद राहणार आहे. खरे तर 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे.
या दिवशी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक तुळजापूर येथे गर्दी करत असतात. यामध्ये काही भाविक पायी सुद्धा येतात. कोजागिरी पौर्णिमेला सोलापूरहून तुळजापुरला पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या खूपच अधिक आहे.
सोलापूर होऊन तुळजापुरला पायी जाणारे भाविक सोलापूर तुळजापूर महामार्गाने जातात. अशा परिस्थितीत जर या महामार्गावर वाहनांची वाहतूक सुरू राहिली तर अपघात होण्याची भीती असते.
हेच कारण आहे की सोलापूर तुळजापूर महामार्ग 14 ऑक्टोबर पासून पुढील चार दिवस म्हणजे 17 ऑक्टोबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा महत्त्वाचा महामार्ग आगामी काही दिवस बंद राहणार आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
हा मार्ग 14 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच 17 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
या काळात या महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास बंदी राहणार आहे. यामुळे नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर-तुळजापूर या महामार्गाने जाणारी वाहतूक सोलापूर ते तांदुळवाडी खानापुर ते तुळजापूर अशी वळविण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हीही या काळात सोलापूर तुळजापूर महामार्गाने प्रवास करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
या निर्णयामुळे सोलापूरहून तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार असून यामुळे अपघाताची शक्यता शून्य होणार आहे.