Maharashtra Cotton Rate : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. या पांढऱ्या सोन्याला नगदी पिकाचा दर्जा देण्यात आला आहे. याची लागवड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केली जाते.
मराठवाडा आणि विदर्भातील 19 जिल्ह्यांमध्ये तसेच खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये कापसाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात कापूस पिक उत्पादित केले जाते.
कापूस लागवडीच्या बाबतीत महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर येतो. यावरून राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे कापसावर अर्थकारण अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. दरवर्षी विजयादशमीच्या मुहूर्ता पासून बाजारात नवीन कापसाची आवक वाढत असते.
यंदाही विजयादशमीच्या मुहूर्ता पासून कापसाची आवक हळूहळू वाढू लागली आहे. तथापि कापसाचे बाजार भाव सध्या दबावात आहे. आज देखील राज्यातील बाजारांमध्ये कापसाचे दर दबावातच होते.
शेतकऱ्यांची कापसाला किमान नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळावा अशी इच्छा आहे. मात्र सध्या कापसाचे कमाल बाजार भाव साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमीच आहेत.
सध्या महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कापसाला काय दर मिळतो
वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती : आज विदर्भातील वर्धा एपीएमसी मध्ये मध्यम धाग्याच्या कापसाला सर्वाधिक दर मिळाला आहे. या ठिकाणी मध्यम धाग्याच्या कापसाला किमान 7050, कमाल 7300 आणि सरासरी 7150 असा भाव मिळाला आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती : खानदेशातील या बाजारात कापसाला किमान 6550, कमाल 7250 आणि सरासरी 7050 असा भाव मिळाला आहे.
समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 7020, कमाल 7200 आणि सरासरी 7101 असा भाव मिळाला आहे.
सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापसाला किमान 7 हजार 209, कमाल 7209 आणि सरासरी 7209 असा भाव मिळाला आहे.
पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये मध्यम धाग्याच्या कापसाला किमान 6800, कमाल 7101 आणि सरासरी 7050 असा दर मिळाला.