Maharashtra Cotton Rate : मित्रांनो कापूस (Cotton Crop) हे खरीप हंगामात (Kharif Season) उत्पादित केले जाणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड पाहायला मिळते.
महाराष्ट्रातील खानदेश विभाग कापसाच्या उत्पादनासाठी (Cotton Production) संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात नावलौकिक मिळवून बसला आहे. खरं पाहता गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव (Cotton Rate) मिळाला असल्याने या वर्षी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात थोडीशी वाढ झाली आहे.
मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांच्या (Farmer) मते या वर्षी कापूस पिकाला हवामान बदलाचा तसेच मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून कापसाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. यामुळे लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असली तरीदेखील कापसाचे उत्पादन गेल्या वर्षीप्रमाणेच निघणार आहे.
अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये यंदा कापसाला नेमका कसा बाजार भाव (Cotton Market Price) मिळेल तसेच सध्या मिळत असलेला बाजार भाव आगामी काही काळ टिकून राहील का यांसारखे नाना प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया यंदा कापूस बाजार नेमका कसा राहील.
मित्रांनो देशांतर्गत कापसाच्या सूताला मागणी नसल्याने कमी दर मिळत आहे. जाणकार लोकांच्या मते सुताचे दर कमी झाले असल्याने मागणी वाढण्याची शक्यता आता वाढली आहे. सध्या देशांतर्गत कापसाच्या दराचा विचार केला तर पाकिस्तानपेक्षा आपल्या भारतात कापसाला कमी बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे देखील भारतीय कापसाला तसेच सुताला मागणी वाढण्याची शक्यता जाणकार लोक व्यक्त करत आहे.
कापसाची आवक हळूहळू बाजारपेठेत वाढू लागली आहे. मात्र कापसाच्या दरात अजून तरी अपेक्षित असा उठाव पाहायला मिळत नाही. एकीकडे कापूस उद्योगातील लोक कापसाचे उत्पादन वाढेल असं सांगत आहेत तर शेतकरी बांधव अतिवृष्टीमुळे तसेच मध्यंतरी झालेल्या हवामान बदलामुळे कापसाच्या उत्पादनात घट होईल अशी शक्यता वर्तवत आहेत.
सुताला मागणी मागील महिन्यात कमी होती मात्र आता हळूहळू सुताची मागणी वाढत आहे. तरीदेखील सुताची मागणी अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. मित्रांनो सध्या कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल ते दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळत आहे. दरम्यान कापसाची आवक वाढल्याने त्याच्या बाजारभावावर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून कापसाचे बाजार भाव काही काळ नरमच राहणार असल्याचे जाणकार सांगत आहे.
मात्र जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी कापसाला कमीत कमी 9 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळणारच आहे. यामुळे निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळणार आहे. मात्र असे असले तरी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना या वर्षी कमीत कमी 12 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळण्याची आशा आहे.