Maharashtra Cotton Price : महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कापूस दरात रोजाना घट होत होती.
मात्र आज कापूस दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून कापसाने नऊ हजाराचा पल्ला गाठला आहे. राज्यातील आर्वी, मानवत, देऊळगाव राजा तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाने कमाल दराचा 9 हजाराचा पल्ला गाठला आहे. कालपर्यंत कापूस 9000 च्या खालीच विक्री होत होता.
मात्र आता नऊ हजारापेक्षा अधिक दरात कापसाची विक्री होऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना 9 हजार रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी बाजार भाव ध्यानात ठेवून कापसाची विक्री करण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत आज आपण कापसाचे आजचे बाजार भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज दोन हजार क्विंटल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, कमाल आणि सरासरी दर मिळाला आहे.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 380 क्विंटल एच फोर मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला आठ हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9050 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव आठ हजार नऊशे रुपये नमूद झाला आहे.
मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 300 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या निलावाद या एपीएमसी मध्ये कापसाला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9225 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 9160 रुपये नमूद झाला आहे.
देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 100 क्विंटल लोकल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कापसाला नऊ हजार 105 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि सरासरी दर मिळाला आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 320 क्विंटल मध्यम स्टेपल कापूस आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कापसाला आठ हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 9005 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 8810 नमूद झाला आहे.