Maharashtra Bullet Train : बुलेट ट्रेन संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रातच सुरू होणार आहे. सध्या या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असून येत्या काही महिन्यांनी हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर सर्वसामान्यांसाठी हा प्रकल्प सुरू होणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. 2026 मध्ये या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार असा दावा केला जातोय.
अशातच, आता बुलेट ट्रेन संदर्भात आणखी एक मोठी कामाची बातमी समोर आली आहे. भारतातील कोण-कोणत्या मार्गांवर बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे या संदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे.
आणखी कोणत्या मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन?
मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉर व्यतिरिक्त, रेल्वे मंत्रालयाने नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ला अतिरिक्त हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम दिले आहे.
दिल्ली-वाराणसी, दिल्ली-अहमदाबाद, दिल्ली-अमृतसर, मुंबई-नागपूर, मुंबई पुणे हैदराबाद, चेन्नई बेंगलोर, म्हैसूर वाराणसी हावडा या मार्गांवर भविष्यात बुलेट ट्रेन सुरु होणार आहे.
यातील मुंबई ते नागपूर दरम्यानच्या प्रकल्पाचे काम येत्या काही महिन्यांनी सुरू होईल अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी संसदेत मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात माहिती दिली असल्याने आगामी काळात या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकते असे बोलले जात आहे.
एकंदरीत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर मुंबई नागपूर मुंबई पुणे हैदराबाद या आणखी दोन बुलेट ट्रेनची भेट आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे.
यामुळे महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनची संख्या भविष्यात तीन वर जाणार आहे आणि या बुलेट ट्रेनमुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चा प्रवास बुलेट ट्रेन प्रोजेक्टमुळे येत्या काही महिन्यांमध्ये सुपरफास्ट होणार आहे.