Maharashtra Bailpola Rain Alert : बैलपोळ्याचा सण मात्र एका दिवसावर येऊन ठेपला आहे. उद्या अर्थातच 14 सप्टेंबर 2023 ला महाराष्ट्रातील बहुतांशी भागात बैलपोळ्याचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे. बैलपोळ्याचा सण निश्चितच सालाबादप्रमाणे उत्साहात साजरा होणार आहे मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर यंदा चिंतेचे ढग आहेत.
कारण की महाराष्ट्रात जून, ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. फक्त जुलै महिन्यात बऱ्यापैकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात देखील राज्यातील काही भागात पाऊस पडला नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. यामुळे काही ठिकाणी जून, जुलै आणि ऑगस्ट हे तीनही महिने अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.
मूळ खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे तर काही ठिकाणी खरीपातील संपूर्ण पिकांची पावसाअभावी राखरांगोळी झाली आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दोन-तीन दिवस राज्यात चांगला पाऊस झाला. यामुळे ज्या शेतकऱ्यांची पिके वाचली आहेत त्यांना पुन्हा एकदा नवीन जीवदान मिळाले आहे.
पण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे सध्या बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. पण आता शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या शुभमुहूर्तावर आनंदाची भेट मिळणार आहे. यंदा बैलपोळ्याला महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून आता राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होईल आणि राज्यात जोरदार पाऊस होईल अशी शक्यता आहे. येत्या 48 तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे.
येत्या 48 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडणार अशी शक्यता आहे. म्हणजे राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात मात्र पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर विदर्भाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे पावसाचा हा जोर पंधरा सप्टेंबर पासून वाढेल आणि महाराष्ट्रातील बहुतांशी भागात 15 सप्टेंबर नंतर जोरदार पाऊस पडेल. यवतमाळ, वाशिम, गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, अमरावती अकोला या जिल्ह्यांमध्ये 16 सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच येत्या 48 तासांसाठी धुळे, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यासाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकंदरीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला बैलपोळ्याच्या दिवशी दिलासा मिळणार असे चित्र आहे. यामुळे यंदाचाही बैलपोळ्याचा सण शेतकरी बांधव आनंदाने साजरा करतील आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधान पाहायला मिळेल.