Maharashtra Agriculture News : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठमोठ्या योजनांची घोषणा केली. शिंदे सरकारच्या काळात असे काही निर्णय घेण्यात आले आहेत ज्यामुळे सर्वत्र सरकारची वाहवा झाली आहे.
शिंदे सरकारने आपल्या या अवघ्या काही महिन्यांच्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी सरकारने काही अभिनव उपक्रम देखील हाती घेतले आहेत.
खरेतर, महाराष्ट्र राज्य सरकारने सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता राज्यातील सर्वच महत्त्वाच्या शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावले जाणार आहे.
आता सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव लावण्यात येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार अशी माहिती हाती आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे.
मात्र, आता वडिलांचे नाव बंधनकारक राहणार नाही. अर्थातच आधीच्या सातबारा उताऱ्यावर बदल होणार नाही. पण एक मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमिनी खरेदी करायची असेल तर आता उताऱ्यावर आईचे नाव लावावे लागणार आहे.
एवढेच नाही तर फेरफारमध्येही आईचे नाव लावले जाणार आहे. तसेच, विवाहितांना पतीचे किंवा वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब अशी की याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारकडे सादर सुद्धा केला आहे.
भूमी अभिलेख विभागाकडूनच याबाबतची माहिती समोर आली आहे. नक्कीच शासनाच्या निर्णयामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे सकारात्मक पाऊल टाकले जाणार आहे.