Lumpy Skin Nuksaan Bharpai :- राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनासारखा आणखी एक संसर्गजन्य रोग वेगाने पसरत आहे. लम्पी स्किन डिसीज नावाच्या या आजारामुळे गाई-म्हशी मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम दुभत्या जनावरांवर दिसून येत आहे. महाराष्ट्रभरात गेल्या काही दिवसांत या विषाणूमुळे शेकडो जनावरांचा मृत्यू झाला आहे.
जनावरांमध्ये ‘लम्पि स्किन डिसीज’ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकरी, पशुपालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लम्पी स्किन’ आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यात येते.
राज्यात लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या नुकसान भरपाईपोटी ३०९१ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ८ कोटी रक्कम जमा केल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. पुणे जिल्ह्यात १२८ जनावरांच्या मृत्यूपोटी ३१ लाख ४८ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.
राज्यामध्ये ३१ ऑक्टोबर अखेर ३३ जिल्ह्यांमधील ३२०४ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला. एकूण १ लाख ७२ हजार ५२८ बाधित जनावरांपैकी १ लाख १२ हजार ६८३ जनावरे उपचारानंतर बरी झाली. उर्वरित बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत.
नुकसान भरपाइ कशी मिळणार ?
गाय किंवा म्हैस लम्पी स्कीनने मृत पावल्यास संबंधित पशुपालकास ३० हजार रुपये, बैल मृत पावला तर २५ हजार व वासरू असेल, तर १६ हजार रुपये मदत देण्यात येईल.
- जितकी जनावरे लम्पी स्कीनने दगावतील तितक्या सर्व जनावरांसाठी मिळणार मदत
- अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक हे निर्बंध शिथिल
- राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे पशुधन मृत पावलेल्या सर्व पशुपालकांना अर्थसाह्य
- केवळ ‘लम्पी स्कीन’ने मृत झालेल्या जनावरांनाच्या पशुपालकांनाच मिळणार भरपाई
राज्यातील लम्पी स्कीन लसीकरण –
राज्यात आतापर्यंत १ कोटी ४० लाख लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातून १ कोटी ३६ लाख जनावरांना मोफत लसीकरण केले आहे.
जळगाव, नगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक शेतकऱ्यांनी करून घेतलेल्या लसीकरणानुसार राज्यात सुमारे ९७.५४ टक्के जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
प्रतिकारशक्तीच्या मूल्यमापनासाठी नमुने
या विषाणूच्या जनुकीय परीक्षणां तर्गत जिनोम क्रमवारीत तपास णीसाठी आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविले आहेत. या तपासणीमुळे विषाणू मधील जनुकीय स्तरावरील बदलां बाबतची माहिती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे.
लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिका रशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने ७ विभागांमधून प्रतिविभाग दोन गावांतील पशुध नातील लसीकरणापूर्वीचे नमुने व लसीकरणानंतरचे ७, १४, २१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करून ते बंगळुरू येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्था येथे पाठविले आहेत. त्यांचे निष्कर्ष देखील नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित असल्याचे सिंह यांनी
ही लक्षणे जनावरांमध्ये आजारी असताना दिसतात
ह्या त्वचेच्या आजारामुळे प्राण्यांच्या शरीरावर गुठळ्या तयार होतात. त्यांना खूप ताप येतो, डोके आणि मानेच्या भागात खूप वेदना होतात. या काळात जनावरांची दूध देण्याची क्षमताही कमी होते.
ही खबरदारी घ्या
हा विषाणू डास आणि माश्यांसारख्या रक्त शोषणाऱ्या कीटकांद्वारे पसरतो. दूषित पाणी, लाळ आणि खाद्य यांमुळे जनावरांना हा आजार होतो. जेव्हा जेव्हा जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात तेव्हा सर्वप्रथम तुमच्या आजारी गायी आणि म्हशींना वेगळे करा.
त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही वेगळी करा. जनावरे ठेवलेल्या ठिकाणी स्वच्छता ठेवा. असे न केल्यास आपल्या इतर प्राण्यांना या आजाराने ग्रासून आपला जीव गमवावा लागू शकतो.
शेतकरी मित्रानो हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येवू नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे.
लम्पीपासून पशुधनाला वाचवण्यासाठी आणि त्यांच्या उपचारावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. लम्पी आजाराने दगावलेल्या पशुधनाच्या पालकांना तातडीने त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी देखील केली आहे.
अनेक ठिकाणी जनावरांच्या बाजारास बंदी असून जनावरांची विक्री छुप्या पद्धतीने झाली. त्यामुळे लम्पी स्कीन पसरला. त्याचा मोठा फटका दुग्धव्यवसायाला बसला. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.
हे पण वाचा : गव्हाच्या ‘या’ जातीची उशिरा पेरणी केली तरी मिळणार 68 क्विंटल हेक्टरी उत्पादन
कापुस बाजारभावात झाली मोठी घसरण ; वाढतील का कापसाचे बाजार भाव
कोण म्हणत शेती घाट्याचा सौदा ! शेतीसोबतच सुरु करा हे काम ; होणार लाखोंची अतिरिक्त कमाई