Lumpy Skin Disease : सध्या महाराष्ट्रात लंपी आजारामुळे हजारो पशुधन बाधित झाले आहे. या आजारामुळे हजारोंच्या संख्येने राज्यात पशुधनाचा मृत्यू झाला आहे.
अशा परिस्थितीत राज्यातील पशुपालकांवर एक मोठं आर्थिक आणि मानसिक संकट आले असताना मायबाप शासनाकडून पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा देणे हेतू लंपीग्रस्त आजारात दगावलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे आता या आजाराने दगावलेल्या पशुधनाच्या मोबदल्यात प्रत्यक्षात पशुपालकांना अनुदान देखील मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यात देखील बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू झाले असून जिल्ह्यातील जवळपास 103 पशुपालकांना अनुदान मिळाले आहे. यामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरं पाहता जिल्ह्यात आत्तापर्यंत या आजाराने 115 पशुधन मृत्युमुखी पडले आहे.
यापैकी 103 प्रस्ताव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विष्णू गर्जे यांनी निकाली काढले आहेत आणि अनुदान वितरित केले आहे. जिल्ह्यातील 103 पशुपालकांना अनुदानाच्या मोबदल्यात 26 लाख 79 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या 55 गाई 29 बैल आणि 19 वासरू च्या मोबदल्यात जवळपास 27 लाखांची मदत वितरित झाली आहे. यामध्ये सोळा लाख पन्नास हजार गाईंसाठी, बैलांसाठी सात लाख 25 हजार, वासरांसाठी तीन लाख चार हजार अशी एकूण 26 लाख 79 हजार रुपयाची मदत वितरित झाली आहे.
खरं पाहता राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात या आजारामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन दगावत आहे. बाधित जनावरांची संख्या देखील नाशिक जिल्ह्याच्या तुलनेत इतर जिल्ह्यात अधिक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात 99.99 टक्के लसीकरण वेळेत पूर्ण झाले असल्याने या आजाराला आटोकात ठेवण्यासाठी प्रशासनाला यश मिळाले आहे.
नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत पंधराशे सात जनावरांना या आजाराने ग्रासले असून यापैकी पंधराशे चार जनावरे ही उपचार घेऊन पूर्णपणे बरी झाली आहेत. आता जिल्हा 288 जनावरे हे या आजाराने बाधित असून यांच्यावर उपचार चालू आहेत.
जिल्ह्यात जवळपास आतापर्यंत 99.99% एवढे लसीकरण पूर्ण झाल आहे. निश्चितच प्रशासनाला या आजारावर वेळेत नियंत्रण ठेवण्यास यश लाभले असून यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.