Lumpy Skin Disease : आपल्या भारतात गेल्या अनेक दशकांपासून पशुपालन (Animal Husbandry) मोठ्याप्रमाणात केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील पशुपालन व्यवसायावर एक मोठे संकट उभे राहिले आहे.
मित्रांनो, सध्या देशात गाई तसेच म्हशीमध्ये लम्पी व्हायरस आला आहे. लंपी व्हायरस (Lumpy Virus) भारतात झपाट्याने वाढत आहे. मित्रांनो खरे पाहता लंपी स्किन डिसिज यामुळे गाईंना (Cow Rearing) जास्त हानी होत आहे.
यामुळे भारतात सर्वाधिक गाई बाधित (Animal Care) झाल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत हा व्हायरस राजस्थान उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात थैमान माजवत होता. मात्र आता हा व्हायरस महाराष्ट्रात देखील झपाट्याने आपले पाय पसरू लागला आहे.
या भयंकर आजारामुळे आत्तापर्यंत देशातील हजारो गायी (Cow) मरण पावल्या असून त्याचा दुग्धोत्पादनावरही परिणाम झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका कार्यक्रमात सांगितले की, राज्यांसह केंद्र सरकार लम्पी व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासोबतच शास्त्रज्ञांनी लम्पी विषाणू रोगासाठी स्वदेशी लसही बनवल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अनेक राज्ये गुरांमधील लम्पी विषाणूच्या त्वचेच्या आजाराशी झुंज देत आहेत आणि हा आजार दुग्ध क्षेत्रासाठी चिंतेचा विषय बनला आहे.” IDF WDS 2022 ला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले, “आमच्या शास्त्रज्ञांनी देखील लंपी स्किन डिसीज या त्वचेच्या आजारासाठी स्वदेशी लस तयार केली आहे.” ते म्हणाले की, सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये या महाभयंकर आजारामुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे पशुपालक शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. लम्पी विषाणू हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे जो गुरांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे अनेक राज्यात गायी मरत आहेत. हा रोग डास, माश्या, कुंडी इत्यादींद्वारे, गुरांच्या थेट संपर्कातून आणि दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, लंपी स्किन डिसीज या आजारावर भारतीय संशोधकांनी स्वदेशी वॅक्सीन विकसित केली आहे.
यामुळे या आजारावर लवकरच नियंत्रण मिळवले जाऊ शकते असे जाणकार नमूद करत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात देखील लंपी स्किन डिसीज या आजाराचा शिरकाव झाला असून यामुळे महाराष्ट्रातीलही अनेक गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. दरम्यान आता या आजारासाठी प्रतिबंधित उपाय म्हणून लसीकरणाचे काम देखील मोठ्या वेगाने सुरू होणार आहे. तसेच, या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाल्याचे चित्र आहे. निश्चितच भारतीय संशोधकांनी या आजारावर स्वदेशी लस विकसित केली असल्याने पशुपालक शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे.