LPG Gas Cylinder Price : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास लोकांचे बजेट पूर्ण टाईट झाले आहे. महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने खाद्य तेल आयातीवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमती वाढल्या आहेत. किलोमागे वीस ते पंचवीस रुपयाची वाढ झाली आहे. पंधरा किलोच्या कॅनच्या किमती अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही गेल्या काही महिन्यांपासून विक्रमी पातळीवर आहेत.
गॅस सिलेंडरच्या बाबतीतही तशीच परिस्थिती आहे. यामुळे गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट पूर्णपणे चौपट झाले आहे. सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर 850 रुपयांना उपलब्ध आहे. देशातील अनेक शहरांमध्ये 14.2 किलो वजनीचे गॅस सिलेंडर 850 रुपयांना मिळतं आहे.
मात्र महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. जर तुम्ही सिलेंडरच्या किमतीमुळे त्रस्त असाल तर कंपोझिट गॅस सिलेंडर वापरू शकता. 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडरपेक्षा कंपोझिट गॅस सिलेंडर तब्बल 350 रुपये स्वस्त मिळतं.
परंतु हे गॅस सिलेंडर देशातील सर्वच शहरांमध्ये उपलब्ध नाही. सध्या हे सिलेंडर काही मोजक्याच शहरांमध्ये उपलब्ध आहे. हे सिलेंडर आपल्या रेग्युलर गॅस सिलेंडरपेक्षा म्हणजेच 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडरपेक्षा लहान येते.
या सिलेंडरचे वजन हे दहा किलो असते. हे सिलेंडर देशातील मोठ्या शहरांमध्ये सहज उपलब्ध होत आहे. अनेक शहरांमध्ये त्याचे दर खूपच कमी आहेत. उदाहरणार्थ, लखनऊमध्ये कंपोझिट गॅस सिलिंडरचा दर केवळ 477 रुपये असल्याचे आढळून आले.
एवढेच नाही तर या गॅस सिलेंडरमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. वजन कमी असल्याने सहजतेने उचलता येते. जर तुमच्या कुटुंबासाठी सध्याचे सिलेंडर तीन चार महिने जात असेल तर तुम्ही कंपोझिट गॅस सिलेंडर वापरू शकता.
म्हणजे छोट्या कुटुंबासाठी हे कंपोझिट गॅस सिलेंडर एक चांगला पर्याय ठरणार आहे. यामुळे सध्या इंडेन म्हणजेच इंडियन ऑईल हे सिलिंडर पुरवत आहे. पण, या सिलिंडरमध्ये फक्त 10 किलोचा एलपीजी गॅस असतो. म्हणून हे सिलेंडर उचलायला हलके जाते.