LPG Gas Cylinder Price : सध्या दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सबंध देशात आनंदाचे वातावरण आहे. दीपोत्सवाचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. मात्र याच दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.
वाढत्या महागाईने बेजार झालेल्या नागरिकांना दिवाळीत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. खरे तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर सुधारित केले जात असतात.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला देखील एलपीजी गॅस सिलेंडरचे दर सुधारित झाले असून व्यावसायिक गॅस सिलेंडर आज पासून महागले आहे. यामुळे दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाले असल्याने याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत नाही मात्र अप्रत्यक्षरीत्या याचा भार हा सर्वसामान्य जनतेवरच पडतो.
व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्याने विविध खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता असते. यामुळे याचा अप्रत्यक्षरीत्या भार हा सर्वसामान्य जनतेवरच पडतो.
किती वाढल्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती
व्यवसाय गॅस सिलेंडरच्या किमती अर्थातच 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती 01 नोव्हेंबर 2024 पासून वाढल्या आहेत. 19 किलो वजनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 62 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
नवीन रेट नुसार आता राजधानी मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरकर्त्यांना आता गॅस खरेदीसाठी वाढीव ६२ रुपये मोजावे लागणार आहे. आधी मुंबईमध्ये निळा कलरचा व्यावसायिक सिलिंडर १६९२.५० रुपये उपलब्ध होत होता
पण आता हा सिलेंडर १७५४.५० रुपयांना मिळणार आहे. तसेच, कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडर हा १८५०.५० रुपये होता आता तो १९११.५० रुपयांना मिळणार आहे. चेन्नईत १९०३ रुपयांना मिळणारा निळा सिलिंडर आता १९६४.५० रुपयांना मिळणार आहे.
मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत अर्थातच 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही. आजही राजधानी मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडर ८०२.५० रुपयांना उपलब्ध आहे.