LPG Gas Cylinder News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये घरगुती गॅस ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः केंद्रातील मोदी सरकारने पीएम उज्वला योजना राबवल्यापासून या संख्येत उल्लेखनीय वाढ झाल्याचे नोंदवले गेले आहे. आधी फक्त शहरातच गॅस ग्राहकांची संख्या अधिक होती. परंतु आता ग्रामीण भागातही गॅस ग्राहकांची संख्या वाढली आहे.
ग्रामीण भागात देखील जवळपास सर्वच घरांमध्ये गॅस पाहायला मिळत आहे. यामुळे महिला वर्गांना चुलीच्या धुरापासून दिलासा मिळाला आहे. चुलीचा धूर हा मानवी आरोग्यासाठी खूपच घातक ठरतो.
यामुळे ग्रामीण भागातील महिलांना यापासून वाचवण्यासाठी केंद्रातील सरकारने पीएम उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले.या योजनेमुळे गॅस ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.
दरम्यान देशातील घरगुती ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक जून 2024 पासून काही लोकांचे गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काही लोकांना एक जून पासून घरगुती गॅस मिळणार नाही.
निश्चितच असे झाल्यास संबंधित गॅस ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. यामुळे गॅस ग्राहकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. खरे तर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाने एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी, ग्राहकांना ई-केवायसी करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाच्या आदेशानुसार, सर्व गॅस ग्राहकांना ई-केवायसी करण्यास सांगितले गेले आहे. मात्र देशभरात असे अनेक ग्राहक आहेत ज्यांनी अजून केवायसी केलेली नाही. पण केंद्रातील सरकारने ई-केवायसीसाठी डेडलाईन निश्चित केली आहे.
यानुसार देशभरातील सर्व गॅस ग्राहकांना ३१ मे पर्यंत ई-केवायसी करावी लागणार आहे. कारण की या तारखेनंतरही ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल त्या ग्राहकांचे गॅस कनेक्शन बंद केले जाणार अशी शक्यता आहे.
म्हणजे अशा ग्राहकांना एक जून 2024 पासून गॅस सिलिंडर मिळणार नाही. एका गॅस एजन्सीच्या प्रॉपराइटरने सांगितले की, त्यांना पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाकडून त्यांच्या ग्राहकांसाठी 31 मे पर्यंत ई-केवायसी करण्याचे निर्देश मिळाले आहेत.
ते म्हणाले की ग्राहकांसाठी ई-केवायसी करण्यासाठी कर्मचारी एजन्सीच्या कार्यालयात बसतात. त्यांनी सांगितले की, ग्राहकांनी त्यांच्यासोबत आधार कार्ड आणि गॅस कार्ड आणावे आणि त्यांचे ई-केवायसी करून घ्यावे.
ई-केवायसीसाठी ते सर्व ग्राहकांना त्यांच्या स्तरावर कॉल करून माहिती देखील देत आहेत. यामुळे ज्यांचे अजून केवायसीचे काम बाकी राहिले असेल त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यावे. अन्यथा त्यांना भविष्यात गॅस सिलेंडर मिळणार नाही असे स्पष्ट होत आहे.