LPG Cylinder Price Decrease : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या स्तरावर सर्वसामान्य जनतेसाठी, शेतमजुरांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी आणि ज्येष्ठ लोकांसाठी कायमच वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अशा योजना सुरू केल्या जातात. दरम्यान आता केंद्र शासनाने देखील सर्वसामान्य जनतेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय एलपीजी गॅस सिलेंडर बाबतचा आहे.
केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे एलपीजी गॅस सिलेंडर सर्वसामान्य लोकांना कमी किमती उपलब्ध होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सेंट्रल गव्हर्मेंटने सर्वसामान्यांना एक मोठ गिफ्ट दिल असून उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलेंडरवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कापूस बियाणे इतक्या रुपयांनी वाढले, लागवडीचा खर्च वाढणार
दोनशे रुपये प्रति सिलेंडर इतकी सबसिडी आता शासनाकडून दिली जाणार आहे. खरं पाहता या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना आधीपासूनच सबसिडीचा लाभ दिला जात आहे. आता या सबसिडीच्या लाभाची मुदत वाढवली आहे.
आता देशभरातील सर्वसामान्य लोकांना पुढील एक वर्ष एलपीजी सिलेंडरवर सबसिडीचा लाभ मिळू शकणार आहे. निश्चितच यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आज आपण सर्वसामान्यांना किती सिलेंडरवर एलपीजी सबसिडीचा लाभ मिळेल याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स! सीआरपीएफ मध्ये तब्बल 9212 जागांसाठी मेगा भरती, पहा भरतीची सविस्तर माहिती एका क्लिकवर
किती सिलेंडरवर मिळणार लाभ?
उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता प्रति सिलेंडर 200 रुपये इतकी सबसिडी म्हणजेच अनुदान केंद्र शासनाच्या माध्यमातून दिल जाणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना आता एका वर्षात 12 सिलेंडरवर हा लाभ मिळणार आहे. लाभ मात्र 14.2 किलोग्रॅम च्या एलपीजी सिलेंडर साठीच अनुज्ञय राहणार आहे.
म्हणजेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती वापराच्या सिलेंडरवर या सबसिडीचा लाभ केंद्र शासनाकडून दिला जाणार आहे. हा लाभ नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार आहे. एका आकडेवारीनुसार शासनाचा हा लाभ एक कोटी साठ लाख कुटुंबांना मिळणार आहे. निश्चितच शासनाच्या या योजनेमुळे सर्वसामान्य कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी खुशखबर! मुंबई उच्च न्यायालयात निघाली मेगाभरती; 7वी पास उमेदवारांना देखील अर्ज करता येणार, पहा…..