LPG Cylinder : जर तुम्ही एलपीजी गॅस ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. कारण की आज आपण एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की आपण पाहतोय की, गेल्या काही वर्षांमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
या आगीच्या, स्फोटाच्या घटनांमध्ये पीडित लोकांची संपूर्ण आयुष्यभराची कमाई, जमापुंजी त्यांच्या डोळ्यासमोरच राख बनते. तसेच अशा घटनांमध्ये जीवित हानी देखील होत असते. यामुळे गॅस सिलेंडर वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे विशेष आवश्यक आहे.
गॅस सिलेंडर वापरताना जर योग्य काळजी घेतली गेली नाही तर सिलेंडरचा स्फोट होतो. यामुळे गॅस सिलेंडर वापरताना योग्य काळजी घेणे आवश्यक असते. अनेकजण मात्र गॅस सिलेंडर वापरताना योग्य काळजी घेत नाहीत.
कित्येक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की ग्राहकांच्या चुकांमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट होतो. मात्र आपल्यापैकी अनेकांना गॅस सिलेंडर वापरताना आपण काय चूक करतो हेच ठाऊक नसते. यामुळे साहजिकच आपले नुकसान अधिक होऊ शकते.
काय काळजी घेतली पाहिजे ?
तज्ञ सांगतात की, एलपीजी ग्राहकांनी ग्राहक संरक्षणाच्या मानकांचे सक्रियपणे पालन करणे अनिवार्य आहे. पण, ग्राहक संरक्षण मानकांचे योग्य पालन करत नाहीत. अनेकदा असे दिसून येते की, अनेक लोक जेव्हा गॅस संपतोय असे वाटू लागते तेव्हा सिलिंडर तिरका करतात.
पण सिलेंडर तिरका ठेवू नये असे केल्यास आग लागू शकते. एलपीजी सिलेंडर नेहमी सरळ ठेवावे, असे सांगितले गेले आहे. गॅस संपुष्टात आल्यावर सिलिंडर कधीही वाकवू नये, आडवा ठेवू नये, तिरका ठेऊ नये, हे योग्य नाही.
त्याच बरोबर गॅस स्टोव्ह सिलेंडरच्या किमान सहा इंच वर सपाट जागेवर ठेवावा. तज्ञ म्हणतात की, फक्त आयएसआय चिन्हांकित रबर पाईप्स वापरावेत आणि गृहिणींनी स्वयंपाक करताना सुती कपडे घातले पाहिजेत.