Lotus Farming: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून विविध फुलांची शेती (Floriculture) करत आहेत. विशेष म्हणजे फुलांची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरत आहे. अशा परिस्थितीत आज आपण कमळ या फुलाच्या लागवडीविषयी (Lotus Cultivation) सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे, कमळाचे फूल (Lotus Flower) हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे, यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात त्याचा अर्थ खूप खास आहे. विशेष म्हणजे कमळाच्या फुलाची लागवड करून शेतकरी कमी कष्टात चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळवू शकतात.
याआधी कमळाची शेती फक्त तलाव आणि डबक्यांमध्ये होत होती, मात्र शेतीत होत असलेल्या नवनवीन बदलांमुळे आता शेतातही कमळ उगवता येणार आहे. सरकार देखील शेतकर्यांना कमळाची सह-पीक घेण्यास प्रोत्साहित करत आहे, ज्या अंतर्गत ते पाण्यातील चेस्टनट आणि मखाना पिकांसह कमळाची लागवड करू शकतात. चांगल्या नफ्यासाठी कमळाच्या शेतीसह मत्स्यपालन करणे फायदेशीर ठरू शकते.
जुलैमध्ये कमळ शेती मिळवून देईल बक्कळ नफा
भारतात सप्टेंबर-ऑक्टोबर म्हणजेच सणांच्या काळात कमळाच्या फुलाची मागणी वाढते, म्हणून त्याच्या बिया जुलैच्या हंगामात लावल्या जातात. या हंगामात पाऊस आणि स्वच्छ-थंड हवेमुळे त्याची झाडे झपाट्याने वाढतात. शेतकऱ्यांची इच्छा असेल तर ते शेतातही कमळ फुलवू शकतात.
त्यासाठी दोन महिने शेतात पाणी ठेवावे लागते, त्यानंतर जुलैमध्ये कमळाची मुळे लावली जातात. कमळाची मुळे लावल्यानंतर त्याच्या बिया पेरल्या जातात. शेतातील पाणी आणि चिखल या दोन्हीमुळे कमळाची झाडे झपाट्याने वाढतात, त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फुले व कमळच्या काडकीची काढणी करता येते.
कमळ शेतीत होणारा खर्च आणि उत्पन्न
कमळाची लागवड करून कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येते. आजच्या काळात अनेक शेतकरी गहू आणि धान यांसारखी प्रसिद्ध पारंपरिक पिके सोडून कमळाची लागवड करत आहेत, कारण त्यात नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. अहवालानुसार, एक एकर शेतात किंवा तलावामध्ये 6,000 रोपे उगवता येतात.
जे कापणीनंतर 12,000 रुपये किलो दराने विकले जातात. बाजारात कमळाच्या बिया, पाने, फुले, कमळ गट्टे यांना मोठी मागणी आहे. अशा स्थितीत कमळाच्या लागवडीवर सुरवातीला 15,000-22,000 खर्च येतो, त्यानंतर 2-3 महिन्यांत 55,000 रुपयांपर्यंत एका एकरात उत्पन्न मिळते.
अशा परिस्थितीत पाच एकर क्षेत्रात जवळपास तीन लाखांपर्यंत कमाई होऊ शकते. विशेष म्हणजे तीनच महिन्यात शेतकरी बांधवांना तीन लाखांची कमाई होणार आहे यामुळे अल्प कालावधीत शेतकरी बांधव लखपती बनणार आहे.