Latur News : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वंदे भारत एक्सप्रेसची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीची ही ट्रेन अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस घरी उतरली आहे. खरं पाहता सध्या स्थितीला देशात एकूण दहा वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
विशेष बाब म्हणजे यापैकी चार वंदे भारत एक्सप्रेस या महाराष्ट्रात धावत आहेत. गेल्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या हद्दीतच या दोन वंदे भारत ट्रेन धावत असल्याने महाराष्ट्र असे एकमात्र राज्य बनल आहे ज्या ठिकाणी इंटरस्टेट वंदे भारत ट्रेन धावत आहेत. अशातच आता वंदे भारत निर्मितीमध्ये देखील महाराष्ट्राचा मोठा वाटा राहणार आहे. राज्यातील लातूर जिल्ह्यातील मराठवाडा कोच फॅक्टरी मध्ये आता वंदे भारत ट्रेनची निर्मिती होणार आहे.
यासाठीची आवश्यक पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता मराठवाडा कोच फॅक्टरी मध्ये वंदे भारतची बोगी तयार होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे नुकतेच रेल्वे विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या दोन कंपनीच्या माध्यमातून संयुक्तरीत्या दोनशे वंदे भारत ट्रेनची निर्मिती होणार आहे.
यासाठीची निविदा प्रक्रिया देखील पार पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोनशे वंदे भारत ट्रेन पैकी जवळपास 120 ट्रेन या लातूर येथील मराठवाडा कोच फॅक्टरी मध्ये तयार होणार आहेत. तसेच उर्वरित 80 ट्रेन या चेन्नईमध्ये तयार होतील अशी माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता मेट्रो थेट उल्हासनगरपर्यंत धावणार; असा राहणार रूटमॅप, पहा
निश्चितच वंदे भारत ट्रेन आता महाराष्ट्रात तयार होणार असल्याने ही राज्यासाठी अतिशय अभिमानाची बाब असून यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेच्यात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे यात तिळमात्र देखील शंका नाही. खरं पाहता, या चालू वर्षात देशातील अनेक राज्यात विधानसभा निवडणुका राहणार आहेत. तसेच पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका देखील राहतील.
याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे विकासाची कामे सुरू केली जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस देखील वेगवेगळ्या रूटवर सुरू करण्याचा मानस शासनाचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2024 25 पर्यंत जवळपास 400 वंदे भारत एक्सप्रेस संपूर्ण देशभरात धावणार आहेत. यामुळे निश्चितच देशातील रेल्वे वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक गतिमान होण्यास मदत मिळणार आहे.