Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी एक नवीन अपडेट समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. ही योजना जुलै महिन्यात सुरू झाली आणि जुलै महिन्यापासूनच या योजनेअंतर्गत रोख लाभ महिलांना दिला जातोय.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब अशी की, काल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहिण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद झाली.
अर्थातच, येत्या काही दिवसांनी डिसेंबर महिन्याचा पैसा देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आमचे सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती.
त्यामुळे अनेक महिलांच्या माध्यमातून या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना 2,100 रुपयांचा लाभ केव्हापासून मिळणार हा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान आता याच संदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे.
केव्हापासून मिळणार 2100 रुपयाचा लाभ?
माजी मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना कधीपासून 2,100 रुपयाचा लाभ मिळणार यासंदर्भात माहिती दिली आहे. आदिती तटकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, वाढीव निधी हा लाडक्या बहिणींना येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे मार्च २०२५ पर्यंत येईल.
त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आता महिलांना २१०० रुपये मिळण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणारी आहे. दुसरीकडे या योजनेअंतर्गत दिला जाणारा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर अखेरपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
एवढेच नाही तर या योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची देखील आता फेर पडताळणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या फेर पडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र आढळून येतील त्या महिलांचे अर्ज रद्द केले जातील असे सुद्धा सांगितले जात आहे.
कशी आहे लाडकी बहीण योजना?
लाडकी बहिण योजना ही गेल्या सरकारने सुरू केलेली एक प्रमुख राज्य पुरस्कृत योजना आहे. याचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दिला जातोयं. फक्त महाराष्ट्रातील रहिवासी महिला या योजनेसाठी पात्र ठरतात.
पण ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलेले आहे अशा महिला देखील यासाठी पात्र आहेत. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतो. ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे (ट्रॅक्टर वगळता) त्यांना मात्र याचा लाभ मिळत नाही.
आजी-माजी आमदार खासदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळत नाही. आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ दिला जाऊ शकत नाही. तसेच ज्या महिला इतर लाभाच्या म्हणजे संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांनाही याचा लाभ मिळत नाही.