Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. सरकारने देखील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. शिंदे सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेत आहे.
असाच एक निर्णय आहे लाडकी बहीण योजनेचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात या योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेचे अर्ज 1 जुलैपासून भरले जात असून 31 ऑगस्ट अर्ज भरण्याची शेवटची मुदत राहणार आहे.
म्हणजेच अर्ज करण्यासाठी आणखी 30 दिवसांचा काळ बाकी आहे. यामुळे या योजनेचे अर्ज भरण्यासाठी सर्वत्र मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे या योजनेमध्ये सातत्याने बदलही होत आहेत.
त्यामुळे या योजनेसंदर्भात महिलांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण आहे. याच बदलावरून विरोधकांकडून सरकारवर जबरदस्त टिका केली जात आहे. अशातच या योजने संदर्भात एक खळबळ जनक बातमी समोर आली होती.
ती म्हणजे या योजनेसाठी ज्यांनी मराठीतून अर्ज सादर केला असेल ते अर्ज बाद होतील असे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये झळकले होते. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनासहित संपूर्ण विपक्ष मधील नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.सर्वसामान्यांमध्ये देखील ही बातमी समोर आल्यानंतर मोठे नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.
यामुळे सर्वसामान्यांमध्ये सर्वत्र गोंधळ माजला होता. कारण की अनेक महिलांनी मराठीतून अर्ज केला होता. महिलांनी आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतूनच अर्ज करणे सोयीचे असल्याने मराठीतूनच मोठ्या प्रमाणात अर्ज भरले होते.
नारीशक्ती दूत या एप्लीकेशनवर देखील मराठीचा पर्याय असल्याने मराठी भाषेतच अर्ज करण्यास प्राधान्य दाखवण्यात आले.पण, नुकत्याच काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयाने एक परिपत्रक काढले.
या परिपत्रकात ज्यांनी मराठीतून अर्ज भरलेले असतील त्यांचे अर्ज रद्द केले जातील असे म्हटले गेले होते. यामुळे सहाजिकच महिलांना मोठा धक्का बसला होता. या संदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये झळकताच यावरून सरकारवर मोठी टीका देखील झाली. महिला वर्ग देखील या परिपत्रकामुळे गोंधळात आला होता.
पण आता सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात सरकारचा स्टॅन्ड क्लिअर केला आहे. तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
या परिपत्रकात मराठी भाषेमधील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटी मुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.