Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारने जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची घोषणा झाल्यापासून ही योजना चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. अर्थातच एका पात्र महिलेला एका वर्षात 18000 रुपयाचा लाभ मिळणार आहे.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
आता या योजनेच्या पात्र महिलांना याचा पुढील हप्ता म्हणजेचं डिसेंबर महिन्याचे पैसे नेमके कधी खात्यात जमा होणार हा प्रश्न आहे. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे. खरंतर लाडकी बहिण योजना सध्या आचारसंहितेमुळे बंद आहे.
ही आर्थिक लाभाची योजना आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बंद झाली असून यामुळे महिला वर्गात संभ्रमअवस्था पाहायला मिळतं आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार का ? असा प्रश्नही अनेकांना पडलाय.
आता याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्टीटरवर माहिती दिलीये. तटकरे यांनी सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून म्हटलंय की, विरोधी पक्ष लाडकी बहीण योजनेबाबत खोटी माहिती पसरवत आहेत.
4 ते 6 ऑक्टोबर 2024 या कालावधीत 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळाला. तसेच, सर्व पात्र महिलांना डिसेंबरच्या हफ्त्याचे पैसे डिसेंबरमध्येच दिले जातील. म्हणून महिलांनी या योजनेबाबत कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केलं आहे.
या तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता
लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता हा डिसेंबरमध्ये जमा होणार आहे. 15 डिसेंबरच्या सुमारास म्हणजे नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर याचा पुढील हफ्ता खात्यात जमा केला जाणार असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.