Ladki Bahin Yojana : गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक मोठमोठ्या योजनांची घोषणा केली. लाडकी बहिण योजना ही अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेची सुरुवात झाली असून आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
याचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना होतोय. जुलै महिन्यापासून या योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांना तब्बल 9 हजार रुपये मिळालेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी जमा केले होते.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि दिवाळीचा काळ पाहता दोन महिन्यांचे पैसे सोबतच जमा करण्यात आले होते. दरम्यान, या दोन महिन्यांचे पैसे जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची वाट पाहिली जात होती.
मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. 31 डिसेंबर पर्यंत या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
अशातच, आता या योजनेच्या संदर्भात आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. खरंतर या योजनेसाठी अनेक महिलांना दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करता आला नव्हता. यामुळे आता या योजनेसाठी पुन्हा एकदा नव्याने अर्ज भरण्याची सुरुवात कधीपासून होणार? हा सवाल उपस्थित होतोय.
दरम्यान आता याच संदर्भात नवीन अपडेट हाती आली आहे. दिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या २ महिन्यांचा हफ्ता एकत्र देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याचा हफ्ताही अकाऊंटमध्ये आला आहे.
मात्र अजूनही काही महिला आहेत, ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाहीये. आता, अशाचं महिलांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस पुन्हा सुरु केली जाऊ शकते. आगामी बजेटमध्ये, महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते.
ही घोषणा झाल्यानंतर, पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरु होऊ शकते, असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. म्हणजेच नव्याने अर्ज भरण्याची सुरुवात अर्थसंकल्पानंतरच होण्याची शक्यता आहे. साहजिकच यासाठी काही दिवस वाट पाहावी लागू शकते.