Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे लाडक्या बहिणींच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत. या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जात असून आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत.
जुलै 2024 पासून या योजनेचा प्रत्यक्षात महिलांना लाभ मिळतोय. आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार याची महिलांना आतुरता लागलेली आहे. येत्या काही दिवसांनी मकर संक्रांतीचा पर्व संपूर्ण राज्यभरात साजरा केला जाणार आहे.
यामुळे मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये दिले गेले पाहिजेत अशी देखील मागणी लाडक्या बहिणीकडून उपस्थित केली जात आहे. दरम्यान फडणवीस सरकार लवकरच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे देणार असल्याची बातमी समोर येत आहे.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर लाडक्या बहिणींना 14 जानेवारीच्या आधी म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधीच लाडकी बहिण योजनेचा पुढील सातवा हप्ता दिला जाईल. नक्कीच फडणवीस सरकारने याबाबतचा निर्णय घेतला तर राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे.
2100 रुपयांचा लाभ केव्हापासून मिळणार?
निवडणुकीच्या काळात महायुतीने राज्यात पुन्हा एकदा आमच सरकार आले तर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देऊ अशी घोषणा केली होती. यामुळे आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापित झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ केव्हापासून मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अदिती तटकरे यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना एक विषय रुपयांचा लाभ मिळू शकतो असे संकेत दिलेले आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा निर्णय होईल, यासाठी निधीची तरतूद केली जाईल आणि प्रत्यक्षात मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ दिला जाऊ शकतो असा एक अंदाज समोर येत आहे.