Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजने संदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे मिळालेले आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात.
या योजनेतून आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले असून डिसेंबर महिन्याचा पैसा नेमका कधीपर्यंत खात्यात जमा होणार या संदर्भातही मोठी माहिती हाती आली आहे.
राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपल्याबरोबर या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा करू असे आश्वासन दिले होते. यानुसार काल अर्थातच 21 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन अशी सांगता झाली असून आता महिलांना या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे.
अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे यांनी देखील या संदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. ही योजना कधीही बंद पडणार नसून चालूच राहणार आहे, डिसेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं.
त्यामुळे आता लवकरच हे पैसे बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात यामुळे महिलांनी आता बँकेच्या मेसेजची वाट पहावी. कारण की डिसेंबर अखेरपर्यंत या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे सोबतच जमा होतील असा दावा करण्यात आला होता. मात्र सरकारकडून या संदर्भात अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे खरच एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार का ? हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. परंतु, सध्या स्थितीला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार डिसेंबर महिन्याचे पैसे डिसेंबर एंडिंग पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असून आज उद्याला पैसे जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता देखील आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महिला डिसेंबर महिन्याच्या पैशांची वाट पाहत होते आणि आता लवकरच हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याने या पात्र महिलांच्या चेहऱ्यावर आता पुन्हा एकदा मोठे समाधान पाहायला मिळणार आहे.